दिले काळीज मिठीला,
तिला कळणार नाही।
काही झोळीत गाठीला,
स्वप्न सरणार नाही।
तिचा मोगरा सांडू दे
गच्च वेणीच्या घडीतून,
गंध श्वासांच्या गतीला
रोध ठरणार नाही।
पदराची काढ खोड,
माती कोरणार वेड।
चिमटीच्या वेदनेला
शब्द छळणार नाही।
जाता जाऊ दे काळीज,
जशी कोसळावी वीज।
तुझ्या पाउस भेटीला,
चिंब भिजणार तीही।
- भूराम 🌹💫🌸🎶💕