रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

काळीजाचा भार

चांद वेंधळा माळीला तू
केसांच्या बटात
टच्च चावूनिया ओठ
सुख लाजले सुखात.
मग आरश्याला झाली
ही लागण गे तुझी
बघ साजिरा तो झाला
तुझ्या देखण्या रूपात.
कसा पदर खोचीला
रंग रंगल्या काचोळी
मग खटयाळ वाऱ्याने
केली घुंगरांची खोडी.
बाई कशाला आवर,
नको नजरेचे वार
कुणा साहावेल सांग
काळीजाचा भार.

-भूराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा