शुक्रवार, १५ मार्च, २०१९

पखवाज

डोळे,
आभाळ भोळे
चंद्र साऊली हिंदोळे
गर्द गाभुळते निळे
निर्मळाशी खेळे

नाक
कोरलेली झ्याक
जणू कमानी बलाक
हिरा जडलेली लाख
तेजारवी हाक

कान
जडलेली छान
कर्णफुले त्याचा प्राण
गुंजारवी ते अजाण
हरवले भान

ओठ
गुलाबांची भेट
गोड लाजरा समेट
भिडे काळजाला थेट
धरलीगे वेठ

काज,
निलोभते साज
नाही कुणा येतो बाज
नादे नित पखवाज
हळवा आवाज

-भुराम