रविवार, १२ जानेवारी, २०२०

मलंग

*****
वेगळा मी झालो
बांधला मी गेलो
ह्या घडी सुखाशी
थांबलो निघालो.
रोज जन्म आहे
जगण्यात मोहे
होवूनी जगाचा
मी मला मिळालो.
वेदना कुणाला
वेदना मनाला
जगी जाणिवेंच्या
ना कुणा कळालो.
गुंतलो मी आता
मोकळा मी आता
भावनेशी ह्याची
मी मलंग झालो.
*****

निघालो
*****
उष्ण आसवे ही
ओघळावी काही
ती पुसूनी घेतां
हासलो निघालो
धावणे हे माझे
चालणे हे माझे
मोज पावलांची
घेत मी निघालो.
रोज जन्म घ्यारे
क्षण हा जगारे
चंद्र आणि तारे
फेकूनी निघालो.
वेदना कुणाची
वेदना ही तुझी
वेच जाणिवांची
पेरुनी निघालो.

-भूराम
११/०१/२०२०