सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

कितीसा


मन गुंतल्या मनात
चांद गुंतला कितीसा
चांदण्यांच्या कोलाहली
सांग बोलला कितीसा
नाही कळे त्याला दुःख
सुखा ओळखे ना तोही
धडधड होत्या देही
जागे जगाला कितीसा
वाऱ्या संगे हा गारठा
रात बिलगलया ओठा
शब्द फुटणारा आता
भावे फुलला कितीसा
कळे पानगळ त्याला
जाळे ओघळ डोळ्याला
ओलं गालाचे पुसून
सांग हसला कितीसा

#भुराम

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०

#वेडे

-------
मन भरतच नाही
क्षण सरतंच राही
चांद देखणा तो वेडा
मला बघतच राही. 

छळे हलका गारवा
मनी भिजला मारवा
दे त्या मिठीतली ऊब
श्वास वितळत जाई.

भान हरपे सारखे
प्राण देणारच धोखे
बोटा गुंतलेली बोटं
बघ सोडवत नाही.

थांब थोडे सुखा इथे
बघ दोघा तू कौतुके
सांग कोण वेडे ह्यात
नाही कळतच नाही

#भुराम