शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

नाझनी



परीघऋता
तू प्रियंवदा
स्पंदरूपा तू
ओघळ ग।

हो नाद मदा
अन चंद्र वदा
स्वर्णधुळीहुन
सोज्वळ ग ।

मधू माखले
हळू लाजले
ओष्ठांवर या
मोहळ ग।

सखे साजणी
रूपे नाझनी
घे बटा सावरून
अवखळ ग।

-भूराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा