गुरुवार, १२ मे, २०२२

आरसपानी

आरसपानी सौदर्य तुझे 
स्पंद तुझा ग जरतारी 
ओठांच्या त्या लालीवरती 
सुख वर्खले मनहारी.

अधीर डूल ते कानी धटले 
नाकी नटली नथ मिती 
सुरेख कमानी भुवयांतुनी 
कुंकुम हसते गोड किती.

गालावरची खळी बोलकी  
नजर उधळती तेज जणू 
नक्षत्रांच्या रांगोळ्यांनी  
साजे सजला पदर म्हणू .

गुंफ गळी स्वर्ण कळ्यांचा 
ठोका टिपतो हाय कसा 
लाखवी लावण्ये रेखी 
दवबिंदूंचा तू ओल ठसा.
 
-भूराम 



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा