बुधवार, १३ जून, २०१८

सुतकं

उगा नको रे मागू
माह्या मराची साधनं
चांद गोंदलेलं मनं
सांज कोरलेली क्षणं

उगा नको रे मागू
तुझे माझे रात धनं
माह्या मिठीतले ऋणं
तुह्या मिठीतले ऊनं 

उगा नको रे मागू
ओठी दडलेली गोटं
तुझं जग झालं पोटं
माह्या पोटी खरगटं

उगा नको रे मागू
तुह्या कुळाले दीपकं
वाटे तुले जे कौतुकं 
माह्या गर्भा ते सुतकं 

-भूराम (६/१४/२०१८)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा