बुधवार, ६ जून, २०१८

झाला दुःखाचा पाऊस

झाला दुःखाचा पाऊस आणि पावसाची गाणी
टपटप थेंबातुनी,
झरलेल्या आठवणी , ...

सरल्या ना आठवणी.

रान आभाळ धरते, प्राण गाभुळ करते
श्वास रेटे श्वासातून,
सर वाटे बतावणी,...

सरावल्या  आठवणी.

किती गुंतलेले मन, नसे गुंता ज्या मनात
रिपरिप सरे ना ती,
डोळा जड झाले पाणी,...

आसावल्या आठवणी.

कुणी बांधले ना सुख, दावणीला आडोश्यास 
गायरान बहरेल, 
लोभ दाविला ना कुणी,...

गढुळल्या आठवणी.

ओल झाले रे शिवार, त्यास डबक्यांचा भार,
त्यात पावले दुडता,
गोड झाल्या पाठवणी,...

उघडल्या आठवणी.

-भूराम ६/६/२०१८(पुणे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा