शनिवार, ५ मे, २०१८

हळूच..

नसे नको ते
प्राण वैभवी
चांद शांभवी .. शून्यातील.

आयुष्याच्या
बंद कोपरी
स्पंद पोखरी .. मौनातिल.

आभाळाशी
बोल बोलती
भाव झेलती  .. नयनकला.   

अंधाराशी
करीत सलगी
वाजे हलगी .. संयत फुला. 

गंध असे ते
धुंद वैभवी
स्पंद लाघवी ..  सदा छळे.

संभोगाच्या
परम समेला
परीघ रेखला .. कुणा कळे.

नसे नको ते
भान सोहळे
चांद ओघळे ..  स्पर्श रुजे.

अंधाराच्या
सिमीत दिठीला
अमित मिठिला .. हळूच निजे.

-भूराम (५/५/२०१८)