नसे नको ते
प्राण वैभवी
चांद शांभवी .. शून्यातील.
आयुष्याच्या
बंद कोपरी
स्पंद पोखरी .. मौनातिल.
आभाळाशी
बोल बोलती
भाव झेलती .. नयनकला.
अंधाराशी
करीत सलगी
वाजे हलगी .. संयत फुला.
गंध असे ते
धुंद वैभवी
स्पंद लाघवी .. सदा छळे.
संभोगाच्या
परम समेला
परीघ रेखला .. कुणा कळे.
नसे नको ते
भान सोहळे
चांद ओघळे .. स्पर्श रुजे.
अंधाराच्या
सिमीत दिठीला
अमित मिठिला .. हळूच निजे.
-भूराम (५/५/२०१८)
माणूस म्हणून जगण्यासाठी केलेल्या प्रयत्नात कविता माझ्या सोबतीला आली.... त्या सोबतीत फुललेल्या काही क्षणांची ही एक पुसटशी नोंद.... (तुमचे अभिप्राय जरूर नोंदवा...)
शनिवार, ५ मे, २०१८
शुक्रवार, ४ मे, २०१८
#चांदणचुरा - एक स्पंदार्पण
मळभी मना, तू मळभी मना
का खुले कळी त्या गडदी खुणा !
सांज धुळीची घडे साहिरी
की ऊन चकाकी हळदी ऋणा .
हळदी ऋणा त्या हळदी ऋणा
घे नवजीवनातील साथ जुना
आयुष्यातील अधीर क्षणांची
दे चांदणचुरा त्या पडदी मना.
***
पडदी मना तू पडदी मना
न उगा जोजवि विलगी पणा
क्षण धिवराच्या रंग मैफिली
खेळ विभोरी दिडदी विणा.
दिडदी विणा तू दिडदी विणा
ते गुपित मनाचे सांग पुन्हा
थेंब थेंब ह्या दव आसूतील
ओल बांधुनी निळं दे घना.
***
निळं दे घना.रे निळं दे घना
आठव त्या ओठी प्राजक्ती खुणा,
बघ तीच टपोरी पाऊस भरती
अन डोळयावरचा दर्दी पणा
दर्दीपणा रे दर्दीपणा
जगता येईना तुझ्याविना
वाट पाहशी सांगून गेला
आणि पुसून गेला परती खुणा.
***
***
***
हसावी आसावे
गोडशी दिसावी
नादल्या नदीत
होडीशीं भासावी
ओंजळी भरता
गलबलून यावी
चांदणचुऱ्या सम
लखलखून जावी.
***
वादळी आसवे
काहीशी असावी
मिठीत भरता
चुरचुर व्हावी
आभळाशी एक
गुपित करावी
बंध नात्यातली
अलगूज गावी..
***
रुसावी आसवे
आडोश्याला यावी
सुख दुखं तिची
सारी पसरावी
नाही हिशोबाचे
नाही तुझे माझे
ज्याला जी ती हवी
त्याने ती वेचावी.
***
नसावी आसवे
कुणाच्यारे गाली
ओठांच्या त्या ओली
चांदणं भरावी
जगावी सुखात
सारी प्राणिजात
स्पंद जीव जीवा
एकरूप द्यावी
५/१/२०१८ (पुणे)
का खुले कळी त्या गडदी खुणा !
सांज धुळीची घडे साहिरी
की ऊन चकाकी हळदी ऋणा .
हळदी ऋणा त्या हळदी ऋणा
घे नवजीवनातील साथ जुना
आयुष्यातील अधीर क्षणांची
दे चांदणचुरा त्या पडदी मना.
***
पडदी मना तू पडदी मना
न उगा जोजवि विलगी पणा
क्षण धिवराच्या रंग मैफिली
खेळ विभोरी दिडदी विणा.
दिडदी विणा तू दिडदी विणा
ते गुपित मनाचे सांग पुन्हा
थेंब थेंब ह्या दव आसूतील
ओल बांधुनी निळं दे घना.
***
निळं दे घना.रे निळं दे घना
आठव त्या ओठी प्राजक्ती खुणा,
बघ तीच टपोरी पाऊस भरती
अन डोळयावरचा दर्दी पणा
दर्दीपणा रे दर्दीपणा
जगता येईना तुझ्याविना
वाट पाहशी सांगून गेला
आणि पुसून गेला परती खुणा.
***
***
***
हसावी आसावे
गोडशी दिसावी
नादल्या नदीत
होडीशीं भासावी
ओंजळी भरता
गलबलून यावी
चांदणचुऱ्या सम
लखलखून जावी.
***
वादळी आसवे
काहीशी असावी
मिठीत भरता
चुरचुर व्हावी
आभळाशी एक
गुपित करावी
बंध नात्यातली
अलगूज गावी..
***
रुसावी आसवे
आडोश्याला यावी
सुख दुखं तिची
सारी पसरावी
नाही हिशोबाचे
नाही तुझे माझे
ज्याला जी ती हवी
त्याने ती वेचावी.
***
नसावी आसवे
कुणाच्यारे गाली
ओठांच्या त्या ओली
चांदणं भरावी
जगावी सुखात
सारी प्राणिजात
स्पंद जीव जीवा
एकरूप द्यावी
***
- भूराम५/१/२०१८ (पुणे)
सोमवार, ३० एप्रिल, २०१८
#चंद्रचुरा - एक शुक्लार्पण
अनुमोघें अनंते अनादी अनोखे
इथे व्यक्त स्पंदातले भाव लोके
नसे ते ना मोती न माती असे ते
जणू चंद्रचुरा माखले गाव होते.
कळी मोदतो मोजता श्वास जेव्हा
खळी गोंदतो भोवती रास ठेवा
कला त्या कलाने उजले भोवताली
जणू स्पर्श ओघे खुळे भाव होते.
नको रे नको ती वेदना चीर काया
जिच्या कुंदनी भेटती मोह माया.
खगांच्या परांची घुंगराळी नदी ती
निळ्या वळणांनी चांदणी नाव होते
आता दूर गेले मनातील नाते
नसे जे ना माझे ,ते माझे का होते!
किती विस्मयाने जगवा मनू मी
जगावा असा की जगणेच घाव होते..
अता विश्वकाळी घडावा जणू मी
अता बोधकाळी कळावा अणू मी
अता विश्वरूपे असे मी नसे मी
नसे, अंत नाही अशी मी धाव होते.
(बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा)
-भूराम (४/३०/२०१८)
इथे व्यक्त स्पंदातले भाव लोके
नसे ते ना मोती न माती असे ते
जणू चंद्रचुरा माखले गाव होते.
कळी मोदतो मोजता श्वास जेव्हा
खळी गोंदतो भोवती रास ठेवा
कला त्या कलाने उजले भोवताली
जणू स्पर्श ओघे खुळे भाव होते.
नको रे नको ती वेदना चीर काया
जिच्या कुंदनी भेटती मोह माया.
खगांच्या परांची घुंगराळी नदी ती
निळ्या वळणांनी चांदणी नाव होते
आता दूर गेले मनातील नाते
नसे जे ना माझे ,ते माझे का होते!
किती विस्मयाने जगवा मनू मी
जगावा असा की जगणेच घाव होते..
अता विश्वकाळी घडावा जणू मी
अता बोधकाळी कळावा अणू मी
अता विश्वरूपे असे मी नसे मी
नसे, अंत नाही अशी मी धाव होते.
(बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा)
-भूराम (४/३०/२०१८)
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)