शुक्रवार, १५ ऑगस्ट, २००८

पाढा--बे एक बे

वरह्यांड्यात बसून आई स्वतःच काम करत करत आपला अभ्यास घेते. आपण अभ्यास करत नाही म्हणून आईने bat-ball लपवून ठेवलीय. अंगनात सर्व मूल खेळतायेत. आणि मी ह्या सर्वात पाढा म्हणताना कसा भरकटत जातो आणि शेवटी आईच्या हातचा मार खातो. अस काहीस मी ह्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न ह्या कवितेत केलाय.

बे एक बे
बे दुणे चार ,...
टेनिसचा बॉल,
कुठे गेला यार?
तिथं होती बँट
कुठे झाली गुडुप
आई ती उठली
ऊचलल सूप.
सुपातले गहू
"सांस की बहु ?"
पाखड़ता गव्हाला
शिंकला तो बाळ्या.
बाळ्याच्या हातात
भोवरयाची दोरी.
सुटलेला भोवरा
भिरभिर करी.
ओरडला रव्या
खिदळली ठमी
बाजूच्या बाकावर
चाललीय रमी.
राजा की राणी,
किल्वर का बदाम,
बूढी काय भजते
"रावण का राम?"
हातातली काठी
वाकडी कंबर
चष्म्यातले डोळे
बघे खाली-वर.
वाजली ती घंटी
कोण आला दारी?
ब्रेडवाला मामू
"टोस्ट की खारी?"
शेजारची काकू
बोलावते त्याला
काकुची चिंगी
चिडवते मला.
"चिंगी रे चिंगी
वाजव तुझी पुंगी"
रडू आले तिला
च्यायची ढोंगी.
पाठित धपाटा
"बे त्रिक आईsss!"
"अभ्यास कर पिंट्या
नाही तर खर नाही!"...
बे चौक आठ
दुखत होती पाठ
बे पंचे दहा
बे सक बारा.....
...
..
बे दाहे विस
चिंगी होती खवीस...

-भूराम

२ टिप्पण्या:

  1. तुमच्या कविता चांगल्या वाटल्या. तुम्ही त्या फेब्रुवारी २००९ मध्ये कॅलिफोर्निया येथे होणार्‍या साहित्य संमेलनात प्रवेशिका म्हणून पाठवाव्यात असे सुचवू ईच्छितो. ह्याविषयी अधिक माहिती तुम्हाला मिलिंद भांडारकर यांना व्य. नि. (ई-मेल) करून मिळवता येईल. त्यांचा ई-मेल पत्ता milind.bhandarkar@gmail.com.

    उत्तर द्याहटवा