रविवार, १५ डिसेंबर, २०१९

मन

मन कारण सुखाचे
मन कारण दुःखाचे
मना घडणे रे रोज
जो रे रोज आज वाचे.
ह्या सावळ्या त्वचेला
किती बिलगावे डोळे
कुणा वाटेना सुंदर !
मन जसे आहे ज्याचे.
कुणा ज्ञान ज्ञान किती
कुणा अहंकारी मती
कुणा कळे ना ते बोल
मन भाव ते बोलाचे.
भुलू नको  त्या रुपाला
भुलू नको  त्या बोलाला
मन शोधू दे मनाला
न घे ओझे ह्या जगाचे.
-भुराम
१२/१६/२०१९

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१९

रुजण्याची वेळ झाली.


तुझी नी माझी मैत्री 
जगण्याची वेळ झाली
सूर्या बसू जरासे का? 
निघण्याची वेळ झाली!
तो बघ तो किनारा 
अस्प्ष्टश्या काजव्यांचा
दे तेज तू तयाला 
जळण्याची वेळ झाली.
ती गोड़ ती मघाची 
किलबिल पाखरांची
बोलू जरा घडीभर 
उडण्याची वेळ झाली.
मी सांगू का तुला रे 
ते दुखणे सावल्यांचे
त्यांच्या मिठीत आता 
घडण्याची वेळ झाली.
तू गेल्यावर आता 
जगणे मला रे काही
जा माणसांत माझी 
रुजण्याची वेळ झाली.

-भूराम
11/11/2019

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

चूक तू!

स्पंद तू, गंध तू
मोकळा आनंद तू
मेघ तू, ओघ तू
बोलकी गं धुंद तू
ओह तू!, वाह तू!
हृदयी वेडा मोह तू
की सुखाशी गुंतलेला
सावळा संमोह तू
गोड तू, ओढ तू
काळजाची मोड तू
हलकेच काढलेली
लाजणारी खोड तू
हो सुखाचें सुख तू
हो प्रेमाची भूक तू
देवालाही आवडे जी
छान भोळी चूक तू..

-भूराम