अनुमेघ मनाची ओंजळ
की संकर्षातील मृगजळ,
आत्म्यात दाटुनी येता,
ती भवतालाची पडझड.
हा स्वर उरांनी भरतो
कंठात कणभर मुरतो
आक्रोश दाटुनी येता,
ती विस्ताराची तडफड.
आवेश सुरांचा होतो
तो मेघ मेघ अत्तरतो,
ओथंब दाटुनी येता,
ती स्पंदरवांची वर्दळ.
हा सांज कवीचा ऱ्होरा
की बंद कुपी पँडोरा,
गहिवर दाटुनी येता,
उठे काहुरांची वादऴ.
-भूराम
2/15/2014
माणूस म्हणून जगण्यासाठी केलेल्या प्रयत्नात कविता माझ्या सोबतीला आली.... त्या सोबतीत फुललेल्या काही क्षणांची ही एक पुसटशी नोंद.... (तुमचे अभिप्राय जरूर नोंदवा...)
शनिवार, १५ फेब्रुवारी, २०१४
रविवार, ९ फेब्रुवारी, २०१४
दैव
लाघवे नित लाघवे
हे प्राण सावल्यातले
तू मोह हो ऋतू माखला
अन स्पंद स्पंद नित्यातले.
हा सोहळा शुन्यातला
जीवनातला जगण्यातला
आहेच काय येथे तुझे
धावणेच दो श्वासातले.
आरास ही बघ साजरी
मांडू कशी तुडवु कशी
सर्वस्व देते सांडुनी
आयुष्य ह्या नात्यातले.
बघ साजणे हे दैव ग
पावूल वेडे वाकडे
माग घेणे ना कधी
कोसळणेच जात्यातले.
-भूराम
२/९/२०१४
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)