उन्ह लाजलं धुक्यात
कसे बघते आडून
परसात मोगरा तो
गेला दवांत भिजून.
त्यात आली चिउताई
चोची दाना थोडी घाई
तिच्या पंखावर त्याने
दिलं ओझे ते ठेवून.
गोडं केसरी बिलोरे
छान क्षितीजी फुलोरे
थोडे अवघड होते
त्याची धिटाई बघून.
किती कुरापाती तूरे
रंगं बदलत सारे
छान गुलाबी झोपले
देतो जग उठवून.
-भूराम