गुरुवार, ११ जुलै, २०१९

ती अंतयात्रा

नाही बाधला गे जीव
नाही बांधला गे शिव
क्षणे तिच्या तिरडीला
नाही कसली उणीव.

दारी कुंकुवाचा सडा
त्यास हळदीचा वेढा
ओस पडल्या वाटेला
नाही कसली जाणीव.

दे रामनामाचा गजर
घेत खांद्या खांद्यावर
जड पाऊली वाटेला
ओढे वैकुंठाची शीव.

माय पोरीच्या डोळ्यात
पोर मायेच्या नाळ्यात
सखा मानसी जाळ्यात
प्रेत जाळती राखिवं.

झळा झळा आगी धगं
तिचा सरलेला वगं
गोतावळा परतावा
घेवून गेलेल्याची किवं.

-भूराम
(pune)