तुझी आठवण येतेय
श्वासागणिक ही प्रत्येक ओढ
धाग्या धाग्यात ओवली जातेय.
सावल्यांची ती हलकी कलकल
पावला पावलात पेरली जातेय.
धडधडत्या त्या काळीज कथेला
सांगत रोज तेच गाऱ्हाणे
धुराळ्यातील काजळ घडीला
चुकत राहाते तुझे न होणे
आभाळातही ठिणगी ती
जगत जळत जातेय
छेडू नको त्याच पुन्हा त्या
गेल्या मेल्या गोष्टी
डोळ्या माखल्या भावमनांनी
बरबटून जाते श्रीष्टी
घरभरल्या नात्यांना मग
ओघळ ओघळ येतोय
हलकं फुलकं जगायच मग
दिसेल तिथे अडवायचे ढग
श्वास सावली, कुठे पावली
ठेका घेत गिरकी गिरकी
रोज मोठी मोठी होतेय
खरंच खूप आठवण येतेय.
-भूराम
८/६/२०१८