स्वप्नांत साहिले मी स्वप्नातले उसासे
काही कुठे मिळाले जगण्यातले दिलासे.
आवाज त्या गतांचा गुणगुणतोय कानी
कुणी कधी न केले जगण्यातले खुलासे
मी रोज चालतांना मोजे ह्या पावलांना
थांबून होय काही गुणले कुणा कुणासे
काळोख हाही होता माझा सखा मनाचा
गुपित त्या दिसाचे दिले तया जरासे
आहे अजून देही माझ्याच भावना ह्या
विचारता कुणी मज सांगा तया बरा-से
हा देह सोडताना, सोडून काय देऊ
देतोय फक्त आता लाह्या आणि बत्तासे.
-भुराम
अश्याच मराठी पोस्ट साठी भेट https://TarunMarathi.com द्या
उत्तर द्याहटवाhttps://tarunmarathi.com
उत्तर द्याहटवा