सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८

होती बांधली कविता

होती बांधली कविता
सांजसावल्या धरुन
निळ्या चांदणिचे ऊन
आता साहवेना तिला.

होती माळीन कविता
बागेतील रूपवान
कुण्या भ्रमराचे फुलं
आता तोडवेना तिला.

होती गाफील कविता
तिला तीचे नाही भान
भवा भुताचे तोरण
आता रुचे नाही तिला.

होती गाभणं कविता
पोटी कुणाचा तो प्राण
पाय जड हे आवेगी
आता गती नाही तिला.

-भूराम
३०/१०/२०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा