सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

(5) आठ-ओळ्या..contd...



(२७)
पाखरा घन निळे
पारधे क्षण मिळे
चांदणी ओघळ होता
शैशवी प्राण खुळे
अनघे मन्म सविता
विलगे देह कविता
स्पंदांची ओंजळ होते
अर्घ्य हे दान कळे.
---------
- भूराम


(२८)
भाव विभोर स्पर्शांची
स्पंद दोन हर्षाची
नाद खुळ्या लहरीं ह्या
व्यक्त गौणाकर्षाची
थरथरत्या पदरावर
स्पंदातीत अधरावर
रोज नवे भाव रुजे
चंद्रांकी विमर्षाची.
---------
- भूराम


(२९)
परीघाची भाषा ही
बंदिस्त अन आशाही
उगमाशी अंत असे
धावणारे वेडे ससे
आरोही अवरोही
ओझ्यांचे क्षण भोई
जिवनाच्या जात्यावर
दळणेच प्रारब्ध असे.

---------
- भूराम


(३०)
स्वप्नफुले जरतारी
मोह खुळे वल्हारी
मायेच्या परिघाशी
नाते नवे रंगारी.
तिमीराशी घन झरतो
अधरी घुंगर भरतो
सृजनाच्या लहरींनी
नाद उठे मल्हारी.
---------
- भूराम

(३१)
आनंदी मोद खिरे
स्वप्न रोज शोध परे
घन देहा तिमिराशी
शांत रुप देत खरे
अनुमोदन शिशिराचे
सळसळते घर माझे
पानगळी जिवनाच्या
उगमावे प्राणझरे.
----
भूराम

(३२)
जगणारा कोण मी?
जीवनातीत गौण मी
आहुतिस समिधेच्या
बघणारा द्रोण मी !
यज्ञाअंकित अनल जरी
संतत ह्या तूप सरी
जळणारा जाळणारा
हव्य मीच शोण मी.
---
भूराम


(33)
आभाळ सांडले
नाद नदिच्या किनारी
चांद वेलदोडी आला
सांज धरेच्या शिवारी
प्राण पाखरांनी दिली ...
सांज हाकारी समेची
जिव परीघी भिजला
वाट पेटली माघारी.
-भूराम



(34)
पारंबी झुलते आहे
आडोशी बघते आहे
परतीच्या वाट केव्हा
गजबजल्या होती पाहे
भाऊच्या पाठी ओझे ...
मायेचे काळीज मोजे
यमाच्या पायी वेढा
दे कच्च तुझाच बाये
-भुराम



(35)
लाघवी तू गे स्तवनांची
नाद नभाच्या वेळी
चंद्राचा काळीज गुंता
स्पंदांची हो रांगोळी
दे तुळशी हळवे बिल्वर ...
किणकिणत्या रुदनांची
लगबग नुसती दमता
उटण्यांने भिजते चोळी

-भुराम


(36)
सन्निधीं श्रीमंत हो तू
आकाशी अनंत हो तू
पळता घडीभर थोडी
घडतां उसंत हो तू
हो व्यक्त स्पंद नादी
आश्वस्थ हो समाधी
जन्मास बांधलेलया
परिघी दिगंत हो तू.
-भूराम
(1) आठ-ओळ्या
(2) आठ-ओळ्या..contd...
(3) आठ-ओळ्या..contd...
(4) आठ-ओळ्या..contd...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा